शिवसेना जेव्हा काँग्रेससोबत सत्तेत बसली तेव्हाच त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली – श्वेता महाले
राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केल्याने सुरुवातीपासूनच भाजपाचे नेते शिवसेनेला लक्ष्य करत आहेत.
राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केल्याने सुरुवातीपासूनच भाजपाचे नेते शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने जेव्हा काँग्रेससोबत आघाडी केली तेव्हाच शिवसेनेने हिंदुत्वाला लाथ मारल्याचा घणाघात भाजपा आमदार श्वेता महाले यांनी कले आहे.