Suresh Dhas : वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…’त्यांना शिक्षा होणार’

| Updated on: Jan 14, 2025 | 4:49 PM

एकीकडे वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर दुसरीकडे पुढच्या १० मिनिटात बीडच्या परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परळी बंदची हाक दिली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर दुसरीकडे पुढच्या १० मिनिटात बीडच्या परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परळी बंदची हाक दिली. अशातच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. एसआयटीने जे काही काम केलं आहे, त्यानुसार फर्दर डेव्हल्पमेंट नुसार कोर्ट ऑर्डर देत आहे. त्यामुळे कुणी मागणी केली याचा विषय नाही. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीने काम केलं आहे. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील त्यांना शिक्षा करण्यात येणार आहे’, असे सुरेश धस म्हणाले.

Published on: Jan 14, 2025 04:49 PM
Beed Case : वाल्मिक कराडवर मकोका अन् 10 मिनिटांत परळीत शुकशुकाट, समर्थक रस्त्यावर अन्…
वाल्मिक कराडवर मकोका, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला? Mcoca Act म्हणजे नेमकं काय?