Suresh Dhas : ‘मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा…’, सुरेश धसांचा पुन्हा निशाणा
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना आका या शब्दाचा उल्लेख करताना दिसताय. मात्र काल त्यांच्याकडून मुन्नी या शब्दाचा उच्चार करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला महिना उलटून गेलाय तरी सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. दरम्यान, त्यातच आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, याकरता ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात सुरेश धस देखील सहभागी होताना दिसताय. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना आका या शब्दाचा उल्लेख करताना दिसताय. मात्र काल त्यांच्याकडून मुन्नी या शब्दाचा उच्चार करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मुन्नी नेमकी कोण? याच्या चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान, सुरेश धस यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर आरोप केलेत. त्यानंतर सुरेश धस यांनी मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला. ती मुन्नी आहे, तिला कळले आहे, ती महिला भगिणी नाही. ती मुन्नी राष्ट्रवादी मधलीच आहे. मुन्नीसोबत आमचे चार पाच वेळा फोटो असतील. मुन्नी बोलत नाही, मुन्नीचे कपडे टरा टरा फाडेल. मुन्नी मला घाबरत आहे. मुन्नीचे माझ्यावर फार प्रेम आहे. आपण मुन्नीची वाट पाहूयात, असे सुरेश धस म्हणाले.