Suresh Dhas Video : ‘…अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल’, सुरेश धसांचा अजित पवारांना खोचक टोला
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नव-नवीन घडामोडी समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर होत होता त्या वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातूनही मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णु चाटे याचं नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं. त्यानंतर त्याचं निलंबन कऱण्यात आलं आहे. यासर्व प्रकारानंतर चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहे. विष्णु चाटे जेलमध्ये आहे. त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करावीच लागेल नाहीतर इज्जतीचा पंचनामा हाईल’, असं सुरेश धस म्हणाले.