Video : सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला, पडळकर आक्रमक
सांगलीतल्या (Sangli) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या (ahilya devi holkar statue) लोकार्पणाचा वाद पेटला आहे. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत. पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीला आज पिवळं रुप दिलंय. “ज्या शरद पवारांनी […]
सांगलीतल्या (Sangli) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या (ahilya devi holkar statue) लोकार्पणाचा वाद पेटला आहे. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत. पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीला आज पिवळं रुप दिलंय. “ज्या शरद पवारांनी (sharad pawar) गोरगरिबांची फसवणूक केली. त्या पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होऊ नये”, अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे.