Gopichand Padalkar | आरोग्य विभाग घोटाळ्याची चौकशी आरोग्य मंत्र्यांसहीत झाली पाहिजे: गोपीचंद पडळकर

| Updated on: Dec 10, 2021 | 12:28 PM

आरोग्य भरतीतीत होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्यांच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची. जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. आरोग्य मंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा आरोप केला आहे.

Nagpur Election | ट्रिपला गेलेले भाजप नगरसेवक मतदानाच्या दिवशी नागपुरात दाखल
Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी