Sambhajiraje LIVE | दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, संभाजीराजे भडकले
समाजाला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. भोसले समितीने जे 12 मुद्दे दिले आहेत, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. महाराष्ट्र पेटवण सोपं आहे , मला दोन मिनिटं लागतील महाराष्ट्र पेटवायला, असे खासदार संभाजीराजे यांनी बैठकीत म्हटले आहे.
पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेण्यात आला. 2007 पासून मी महाराष्ट्र पिंजून काढलाय. आपला गट तट सोडून समाज एकत्र आला आहे. समाजाला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. भोसले समितीने जे 12 मुद्दे दिले आहेत, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. महाराष्ट्र पेटवण सोपं आहे , मला दोन मिनिटं लागतील महाराष्ट्र पेटवायला, असे खासदार संभाजीराजे यांनी बैठकीत म्हटले आहे.