‘जसं काय संजय राऊत यांना सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार…’, भाजप नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Sep 27, 2024 | 3:28 PM

कोणताही पुरावी नसताना कोणावरही बोलायचं जसं काय त्यांना अधिकारच दिला आहे कोणाचेही कपडे काढ.. त्यामुळे कोणावरही बोलायचं, कोणाचंही जीवन बदनाम करायचं हा संजय राऊत यांचा उद्योग झाला आहे, अशी टिका भाजप खासदाराने केली आहे.

Follow us on

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गुरुवारी आदेश दिला आहे. या आदेशानुसार खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात मुंबई माझगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवित 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंड भरण्याचाही आदेश दिला आहे. संजय राऊत यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर संजय राऊत हे कोर्टासह सरकारवर ताशेरे ओढत आहे. यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सकाळी 9 वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत कोणाची तरी बदनामी करायची हा संजय राऊत यांचा अजेंडा आहे. आता त्यांनी कोर्टावर टीका करताना संघप्रणित कोर्ट म्हटलं. तर रखेल असा शब्द वापरला. इतकंच नाहीतर 15 वर्ष शिक्षा झाली तरी चालेल अशी राऊतांची इच्छा आहे. त्यांच्या दीड-दोन वर्षांच्या पत्रकार परिषदेवर अब्रुनुकसानीचे दावा टाकले तर तर संजय राऊत 15 वर्ष जेल मध्ये जातील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल’, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.