राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसच्या वादात हेमा मालिनी यांची उडी; म्हणाल्या, ‘मी राहुल गांधी यांना…’

| Updated on: Aug 10, 2023 | 5:18 PM

VIDEO | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरून वाद.... राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणी भाजप खासदार हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया, काय केलं मोठं वक्तव्य, बघा...

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेच्या आवारात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केला आहे. हा स्त्रियांचा अपमान असून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्मृती ईराणी यांनी केली आहे. या आरोपामुळे राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी देखील उडी घेतल्याचे समोर आले आहे. फ्लाईंग किसच्या वादावर भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, मी राहुल गांधी यांना फ्लाईंग किस देताना पाहिलं नाही. पण काही शब्द होते, ते योग्य नव्हते. विशेष म्हणजे या तक्रार पत्रावर हेमा मालिनी यांनी सही केली आहे. दरम्यान, भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून राहुल गांधी यांची तक्रारही केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Aug 10, 2023 05:17 PM
‘… आमच्या भगिनीला मिर्ची लागली’, राहुल गांधी फ्लाईंग किस प्रकरणावरून ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा निशाणा
‘भाजप-सेनेची युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते’, कुणी केला हल्लाबोल