Ramdas Tadas | मारहाणीचा आरोप केलेल्या मुलीशी रामदास तडस यांच्या मुलाचा पुन्हा एकदा विवाह

| Updated on: Sep 08, 2021 | 6:30 PM

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता तडस यांच्या सुनेचा आणि मुलाचा वैदीक पद्धतीने विवाह संपन्न झाला आहे.

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबाकडून छळ होत असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तडस यांचा मुलगा पंकज तडस यांनी अखेर पूजाशी वैदिक पद्धतीनं विवाह केलाय. आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडलाय. खासदार तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अखेर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे.

हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. त्यांनी आपली तक्रारही मागे घेतली आहे. सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलिही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटलंय.

Published on: Sep 08, 2021 06:02 PM
Gopichand Padalkar | वळसे पाटील आपण सावधान रहा – पडळकरांचा पाटलांना खोचक सल्ला
Devendra Fadnavis | बेळगावात मराठी माणसाचा पराभव नाही : देवेंद्र फडणवीस