Pragya Singh Thakur | खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा कबड्डीचा डाव
खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना खेळाडूंनी कबड्डी खेळण्याची विनंती केली. त्यांचा मान राखत महिला खेळाडूंबरोबर काही क्षण कबड्डी खेळण्याचा आनंद साध्वींनी लुटला
भोपाळमध्ये भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कबड्डीचा डाव टाकला. साध्वी या शक्तीनगर परिसरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. प्रार्थना केल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी मैदानातील कबड्डी खेळाडू आणि मैदानावर उपस्थित प्रशिक्षकाला मंचावर बोलावले. त्यानंतर त्यांनी क्रीडापटूंचा सन्मान केला. यावेळी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना खेळाडूंनी कबड्डी खेळण्याची विनंती केली. त्यांचा मान राखत महिला खेळाडूंबरोबर काही क्षण कबड्डी खेळण्याचा आनंद साध्वींनी लुटला