रोहित पवार नॉट रिचेबल? शरद पवार गटाचे शिर्डीच्या शिबिराला गैरहजर, कुणी लगावला खोचक टोला?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर सुरू आहे. या शिबिराला आमदार रोहित पवार हे गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं, याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. आमदार रोहित पवार नेमके कुठे नॉट रिचेबल झालेत हे शोधावं लागेल...
अहमदनगर, ४ जानेवारी, २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला आव्हान देत असताना आता शरद पवार गटानेही लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर सुरू आहे. या शिबिराला आमदार रोहित पवार हे गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं, याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. आमदार रोहित पवार नेमके कुठे नॉट रिचेबल झालेत हे शोधावं लागेल, मात्र हे शिबिर शिर्डीत ठेवल्याने केवळ देवदर्शनासाठी म्हणून या शिबिराला गर्दी होत आहे. हे शिबिर जर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ठेवलं असतं तर राष्ट्रवादीची ताकद समजली असती असा टोला सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरावरून लगावला आहे.