शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘त्या’ आरोपाला उदयनराजे भोसले यांचं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले?

| Updated on: Mar 27, 2023 | 10:44 PM

VIDEO | उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा, टीकेला काय दिलं प्रत्युत्तर

साताराभाजप खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे सातारा सध्या बाजार समिती निवडणुकीचे असून तसेच नगरपालिकेच्या निवडणुका ही काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत अशातच या दोघा नेत्यांनी एकमेकांवर आरोप करणे सुरू केला आहे. उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आरोप केले होते, शिवेंद्रराजे यांनी अजिंक्यतारा, कुक्कुटपालन बाजार समिती बँका आणि महिला बँकांमध्ये लोकांचे पैसे खाल्ले असा आरोप केला. इतकंच नाही तर असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला कसे आले असा सवाल नाही त्यांनी केला होता. या टीकेला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भोसले या घराण्याला अशोभणीय कार्य शिवेंद्रराजे घडत आहे. बोलताना देखील मला वेदना होत आहेत, अशी व्यक्ती या घराण्यात जन्माला आली कशी? असे उदयनराजे म्हणाले.

Published on: Mar 27, 2023 10:44 PM
ठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटली अन् लाखो लिटर पाणी
‘हिम्मत असेल तर..’, इशारा देत भाजपनं उद्धव ठाकरे यांना सांगितलं आघाडीत बिघाडी करण्याचं सूत्र