माझ्यासाठी ७/१२ म्हणजे कागदाचा तुकडा ! महारोजगार मेळाव्यात उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 22, 2023 | 1:15 PM

VIDEO | Future भविष्य म्हणजे... उदयनराजे भोसले यांनी उलगडून काय सांगितला अर्थ, म्हणाले...

सातारा : साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. युवक युवतींच्या पात्रतेनुसार या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे काम कंपन्यांकडून केले जात आहे. या महारोजगार मेळाव्यासाठी दहा हजाराहून अधिक युवक युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या महारोजगार मेळाव्यासाठी आलेल्या तरुणाई सोबत बोलताना खासदार उदयनराजे यांनी आपल्या भाषणात माझं ह्रदय हे कायम तुमच्या प्रगतीसाठी धडधडत राहील. तुम्ही खूप मोठे व्हावे एवढी सदिच्छा व्यक्त करत जिल्ह्यातील तरुण तरुणींनी उंच शिखर गाठावे. यामुळे साताऱ्याच्या वैभवात मोठी भर पडेल अशी भावना यावेळी उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केली. तर यावेळी त्यांनी फ्युचर अर्थात भविष्याचा अर्थही त्यांनी यावेळी उलगडून सांगतिला.

Published on: May 22, 2023 01:15 PM
”भाजपकडे माणसं धुवायची लाँड्री अन् पॉवडरही”; राष्ट्रवादी नेत्याचा भाजपवर हल्ला बोल
गुवाहाटीला गेलेल्यांनी ‘या’ देशात जावं अन्…, संजय राऊत यांनी लगावला शिंदे गटाला खोचक टोला