‘माल’ संबोधल्याने शायना एनसी यांचा राग अनावर, शिवसेना उबाठाच्या खासदारासह नेतृत्वाला धरलं धारेवर
“बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” असं अरविंद सावतं म्हणाले. या टीकेवरून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. बघा काय केला हल्लाबोल?
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एनसी यांनी आज शिवतीर्थवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या भेटीसंदर्भात त्यांना सवाल सवाल केला असताना त्या म्हणाल्या, आमचे कौटुंबिक संबध आहेत. कोणत्याही राजकीय चर्चा आमच्यात झाल्या नाहीत. राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माडियाशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी “बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर टीका केली होती. शायना एनसी यांनी पत्रकारांना एक क्लिप ऐकवली आणि अरविंद सावंत यांच्यावर टीका करत संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. ‘राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं जातंय यावरून अरविंद सावंत आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता लक्षात येत आहे. म्हणजे मुंबादेवी येथील प्रत्येक महिला ही माल आहे?’ असा आक्रमक सवालही त्यांनी उबाठाला केला. ज्यांच्यासाठी आम्ही निवडणुकीला प्रचार केला. मोदींच्या नावावर निवडून आले. त्यांची सुरूवात तेथून झाली आणि आज ते मला माल संबोधतात यावरून त्यांची मनस्थिती लक्षात येतेय. यावरून त्यांनी शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केलाय.