वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले? 10% हिशोब की बीएमसीचा रेट? शेलारांचा खोचक सवाल
वेदांता प्रकल्पा महाराष्ट्रात राहावा यासाठी वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले होते, असा सवाल शेलारांनी विचारलाय. ट्वीट करत त्यांनी शिवसेनेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केलेत. 10% नुसार हिशेब मागितला की मुंबई पालिकेतील (BMC Corruption) रेट नुसार, असा शेलार यांनी विचारलंय.
मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं राजकारण ढवळून निघालं आहे. आशिष शेलार यांनी शिवसेना (Ashish Shelar on Shiv sena) आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टोला हाणला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात राहावा यासाठी वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले होते, असा सवाल शेलारांनी विचारलाय. ट्वीट करत त्यांनी शिवसेनेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केलेत. 10% नुसार हिशेब मागितला की मुंबई पालिकेतील (BMC Corruption) रेट नुसार, असा प्रश्न शेलार यांनी विचारलाय. तसंच सब गोलमाल है, चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय. ‘गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती, तसंच अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती! इतका भ्रष्टाचार बोकाळला होता’, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा दाखलाही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलाय.