युती न होण्याचं कारण सांगत भाजप नेत्यानं केला गौप्यस्फोट; म्हणाले, ‘इगो आडवा…’

| Updated on: May 01, 2023 | 9:01 AM

VIDEO | भाजप नेत्याच्या गौप्यस्फोटामुळे स्थानिक पातळीवर ग्रामीण भागात भाजप आणि शिवसेना यांच्यात दुफळी असल्याचे उघड, बघा काय म्हणाले?

ठाणे : भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागा भाजपनं कथोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आनंद साजरा केला. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काल पार पडली. १८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल ३३ उमेदवार रिंगणात असतानाही भाजपने तब्बल १५ जागांवर विजय मिळवत या बाजार समितीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं. तर शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं. यावेळी बोलताना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर मात्र कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली असती, तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची माझी तयारी होती. त्यासाठी शिवसेनेला पाच जागा सोडण्याचीही तयारी मी दर्शवली होती. परंतु शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इओ आडवा आला आणि त्यामुळे ही युती झाली नाही आणि आता त्यांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं, असा गौप्यस्फोट किसन कथोरे यांनी केला.

Published on: May 01, 2023 09:01 AM
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हुतात्म्यांना वंदन
मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ; अजित पवार, जयंत पाटील यांना शिवसेना नेत्याचा टोला