Narayan Rane Video : ‘वा… लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज’; राणेंकडून कौतुक

| Updated on: Mar 21, 2025 | 4:26 PM

चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यावर भाष्य करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांचे कौतुक केले आहे. बघा काय म्हणाले?

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यातून आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. दरम्यान, याप्रकरणावरून विधानसभेतही मोठा गदारोळ झाला. ‘दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी सभागृहात केली. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक ट्वीट करत चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. इतकंच नाहीतर नारायण राणे यांच्याकडून चित्रा वाघ यांचं कौतुक देखील केलंय. ‘वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या 15 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई!’, असे नारायण राणे म्हणाले.

Published on: Mar 21, 2025 04:26 PM
Aditya Thackeray : सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
Ladki bahin yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, कधी मिळणार 2100 रूपये? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं…