Vinod Tawde : मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महायुतीतील मुख्यमंत्रीपदावरून मोठं वक्तव्य केलंय. आमदारांच्या संख्याबळावरून मुख्यमंत्री होणार असं नाही. तर नवा चेहरा किंवा जुना चेहरा रिपीट होऊ शकतो, असं विनोद तावडे म्हणालेत.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. मुख्यमंत्रीपदासाठी नवा चेहरा किंवा जुना चेहरा रिपीट होऊ शकतो, पण हे सर्व निवडणुकीच्या निकालानंतर ठरवला जाणार, असं विनोद तावडे म्हणालेत. तर आमदारांच्या संख्याबळावरून मुख्यमंत्री होणार असं नाही, असंही विनोद तावडे म्हणाले. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती विधानसभा निवडणूक लढवत आहे. मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर कोणाचा मुख्यमंत्री होणार ? याचा निर्णय निकालानंतर होणार हे अमित शाहांनी देखील स्पष्ट केले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस चांगलेच चर्चेत आहेत. कारण अजित पवार यांनी आपण कॉम्प्रोमाईज करणार असून थांबणार असल्याचे टिव्ही ९ शी बोलताना सांगितलं आहे. विनोद तावडेंनी महायुतीचं सरकार येणार असा दावा करताना यंदा भाजप ९५ ते ११० जागांपर्यंत जाईल. शिवसेना शिंदे गट ४५ ते ५५ जागा जिंकेल. राष्ट्रवादी अजित पवार गट २५ ते ३० जागा जिंकेल. तर संपर्ण महायुती मिळून १६५ ते १७० पर्यंत जाऊ, असा अंदाज विनोद तावडे यांनी व्यक्त केला.