Special Report | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नारायण राणेंनाही नो एन्ट्री
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या कार्यकारिणीतून मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे. तर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
Published on: Oct 07, 2021 10:21 PM