Special Report | मात्र, भाजप नेत्यांच्या ऑपरेशन कमळचं काय झालं?
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे मुंबईमध्ये आगमन झाले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येणार असून, आम्ही महाविकास आघाडी सरकार उलथून टाकू असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान महाविकास आघाडी सरकार हद्दपार करू, असे वारंवार राज्यातील भाजपा नेत्यांकडून ऐकायला मिळते.
मुंबई – महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असे आतापर्यंत राज्यातील भाजपा नेत्यांकडून बोलले जात होते. मात्र आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे मुंबईमध्ये आगमन झाले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येणार असून, आम्ही महाविकास आघाडी सरकार उलथून टाकू असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान महाविकास आघाडी सरकार हद्दपार करू, असे वारंवार राज्यातील भाजपा नेत्यांकडून ऐकायला मिळते. मात्र आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील हद्दपारीची भाषा केल्याने, राजकीय वर्तृळात चर्चेला उधान आले आहे. मात्र दुसरीकडे आमचे सरकार स्थिर असून, पुढील निवडणुकीपर्यंत आम्हीच सत्तेत राहाणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सांगत आहेत.