नितेश राणेंची पोलिसांना धमकी, अन् राज्यात नवा वाद; इम्तियाज जलीलांची जहरी टीका
भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला आहे. सांगलीमध्ये नितेश राणे यांनी लव्ह जिहादच्या एका मुद्द्यावरून थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांना चांगलंच धारेवर धरलंय.
भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा वाद सुरू झाला आहे. नितेश राणे यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी पोलिसांना थेट बदलीचीच धमकी दिली आहे. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, नाहीतर अशा ठिकाणी बदली करू जिथे बायकोचाही फोन लागणार नाही…असे म्हणत नितेश राणे यांनी पोलिसांना सज्जड दम भरला आहे. दरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंचा शेंबडा असा उल्लेख करत जोरदार पलटवार केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, असं नारायण राणे म्हणाले. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. यावर इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली आहे.
Published on: Aug 15, 2024 11:53 AM