Nitesh Rane यांनी संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिला थेट इशारा; म्हणाले, ‘… तर मग थयथयाट करायचा नाही’

| Updated on: Sep 16, 2023 | 2:34 PM

VIDEO | संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला जाण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रतिक्रियेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे, बघा काय म्हणाले?

मुंबई, १६ सप्टेंबर २०२३ | ‘मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्र्यांच्या प्रेसला नक्की जाणार आहे. पण मी गेलो तर मला पोलीस अडवतील आणि गोंधळ होईल. मला असा गोंधळ नको आहे.’, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला जाण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रतिक्रियेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे म्हणाले, ‘आमच्याकडे पण प्रहार सारखं वृत्तपत्र आहे, त्याचा मी संचालक आहे. आम्ही पण आमच्या संपादकांना घेऊन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत जाणार आणि त्यांना प्रश्न विचारणार मलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आज राऊतांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला तर मी उद्या ठाकरे यांना प्रश्न विचारेल मग थयथयाट करायचा नाही’, असे म्हणत नितेश राणे यांनी इशारा दिला आहे.

Published on: Sep 16, 2023 02:34 PM
Ganesh Chaturthi 2023 | यंदा पैठणीचे वस्त्र परिधान केलेले आकर्षक बाप्पा नाशिकमध्ये दाखल
Cabinet Meeting | संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीतील इनसाईड स्टोरी, राज्य सरकारने कोणते घेतले मोठे निर्णय?