विधिमंडळ परिसरात नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, कोणत्या कारणावरून झाला दोघांत वाद?

| Updated on: Mar 14, 2023 | 3:09 PM

VIDEO | सपाचे आमदार अबू आझमी आणि भाजपचे आमदार नितेश राणे आमने सामने, विधिमंडळ परिसरात खडाजंगी... बघा व्हिडीओ

मुंबई : महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशातच लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवन परिसरातच हे दोघंही नेते आमने सामने आले असून त्यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. दोघांनीही एकमेकांना लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांसमोर नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. तर यावर अबू आझमी यांनी हे खोटं असून मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो, असे आव्हान दिले.

… म्हणून हे सरकार म्हात्रे-सुर्वे प्रकरणाचा उपयोग करतयं; आव्हाडांचा आरोप
‘भाजप-शिंदे गटातील नेत्यांना ओझं, पण या ओझ्याचं भविष्यात करायचं काय?’, संजय राऊत यांचा खोचक सवाल