‘बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान’, भाजप नेत्याची खोचक टीका
VIDEO | उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वार, तर भाजपच्या नेत्याचा पलटवार; बघा कुणी काय केला आरोप-प्रत्यारोप? छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणावरून पुन्हा राजकारण
मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणावरून राजकारण चांगलंच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणाच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चिठ्ठी आल्याचे पाहायला मिळाले. यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘माझ्या नावाची चिठ्ठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजूला काढली. बेकायदेशीर सरकार एकनाथ शिंदे यांनी आदित्य नावाची चिठ्ठी काढली आणि ते नाव बघून ते घाबरले’, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी वार केला तर भाजपचे नेते नितेश राणे यांनी या टीकेवर प्रत्युत्तर देत पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्याला आदित्य हे नाव देणं म्हणजे हा त्या वाघाचा अपमान असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी खोचक टीका केल्याचे पाहायला मिळाले.