प्रचाराच्या रणधुमाळीत डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडलं, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद

| Updated on: Nov 14, 2024 | 3:01 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. अशातच प्रचारसभांचा धडाका सुरू असताना डोंबिवली पश्चिमेत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला.

डोंबिवली पश्चिमेत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तीन ते चार अज्ञातांनी शिवीगाळ आणि मारहाण करत भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात कॅबिनेट मंत्री भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात विधानसभेची थेट लढत होत आहे. डोंबिवली पश्चिमेत झालेल्या भाजप तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवलीमध्ये गेल्या तीन टर्मपासून रविंद्र चव्हाण हे आमदार आहेत. 2009 पासून ते सातत्याने डोंबिवली मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक जिंकत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवली पश्चिमेत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेवरून एकच खळबळ उडाली आहे. भाजपमधील सूत्रांनी या तोडफोडीचा आरोप विरोधकांवर केला आहे.

Published on: Nov 14, 2024 03:01 PM
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्या, गुन्हा दाखल
Vinod Tawade : विधानसभेला भाजपच्या किती जागा येणार?, कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं…