मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांच्या पक्षात परतणार? अकलूजच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरली भूमिका?

| Updated on: Mar 18, 2024 | 10:55 AM

माळशिरसचे मोहिते पाटील पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत येणार का? माढा लोकसभेत महायुतीत खोडा होण्याची दाट शक्यता आहे. माढ्यात विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते इच्छूक होते. मात्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा संधी दिली.

मुंबई, १८ मार्च २०२४ : माळशिरसचे मोहिते पाटील पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तर माढामध्ये भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलंय. त्यामुळे इच्छुक धैर्यशील मोहिते यांचे समर्थक नाराज झालेत. माढा लोकसभेत महायुतीत खोडा होण्याची दाट शक्यता आहे. माढ्यात विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते इच्छूक होते. मात्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा संधी दिली. त्यामुळे भविष्यात माळशिरसचे मोहिते पाटील यांच्यासह फलटणचे निंबाळकर पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परत येणार का? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान मोहितेंच्या अकलूजच्या निवासस्थानावर दोन तास बैठक चालली. या बैठकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात कोणाला उतरवायचं याबदद्ल चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. बघा स्पेशल रिपोर्ट… काय झाली चर्चा?

Published on: Mar 18, 2024 10:55 AM
उद्धव ठाकरे यांनी ‘मोदी का परिवार’वरून मोदींना डिवचलं, तुमचा परिवार कुठे?
अखेर ‘मविआ’चा फॉर्म्युला ठरला, लोकसभेसाठी कोणाला किती जागा निश्चित?