Devendra Fadnavis | 3 दिवस उलटले तरी मदतीची घोषणा नाही, ती तात्काळ करा – देवेंद्र फडणवीस
राज्याचे भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे.
सांगली : महापूर येऊन आठ दिवस उलटले, मात्र अद्याप पूरग्रस्तांच्या मदतीची घोषणा झाली नाही, ती तात्काळ झाली पाहिजे,अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील ढवळी याठिकाणी पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे. मिरज तालुक्यातल्या ढवळी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी गावातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.