ओबीसींचा महाएल्गार, पंकजा मुंजे अन् मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

| Updated on: Nov 17, 2023 | 1:28 PM

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव एल्गार सभेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. यासभेला छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार हजर राहणार आहेत.

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : ओबीसी समाजाचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले तर दुसऱ्याच्या हक्काचं आरक्षण कुणी हिरावून घेऊ नये, असेही त्यांनी म्हटले तर छगन भुजबळ हे खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल वैयक्तित खूप आदर आणि मनात प्रेम आहे. कारण गोपिनाथ मुंडे यांनी वंचितासाठी एक चळवळ उभी केली होती. यामध्ये भुजबळांनी मुंडेंचा सच्चा मित्र म्हणून साथ दिली. त्यामुळे भुजबळांबद्दल विशेष आदर आहे. ओबीसी समाजाच्या मेळाव्याला खूप शुभेच्छा असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तर मराठ्यांना न्याय द्या, त्यांच्या नोंदी त्यांना मिळाल्यात की आरक्षण द्या. मराठा समाजाच्या बाजूने ओबीसी नेते बोलतील अशी आम्हाला आशा असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 17, 2023 01:28 PM
… तर १६० मराठा उमेदवार पाडणार, आरक्षणाच्या लढाईत राजकीय गणितांवरून कुणाचा इशारा?
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरचा राडा ठरवून, शिंदेंच्या शिवसेनेवर कुणाचा गंभीर आरोप?