२०२४ मध्ये भाजपला न भूतो न भविष्यती असा रिझल्ट, कुणी वर्तवलं हे भाकीत

| Updated on: Jan 23, 2023 | 3:18 PM

'ही फक्त सुरूवात, 2024 पर्यंत भारतीय जनता पक्षाला न भूतो न भविष्यती असा रिझल्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिसणार'

सर्वच भारतीय जनता पक्षाकडे वळत आहेत, २०२४ पर्यंत खरं चित्र दिसेल. उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेली शिवसेना ही किरकोळ राहिलेली शिवसेना आहे. २०२४ पर्यंत ती शिवसेना नावारूपाला तरी राहणार की नाही? याची शंका आहे. त्यामुळे 2024 पर्यंत शतप्रतिशत भाजप, अशीच पावलं आम्ही टाकणार आहोत. 2024 मध्ये भाजप पक्षाला न भूतो न भविष्यती असा रिझल्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संख्येत दिसेल, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार यावर प्रतिक्रिया देतांना निलेश राणे म्हणाले, नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार अशी कोणीतरी मुद्दाम बातमी पेरली आहे. पक्ष देईल तोच उमेदवार असेल. नारायण राणेंनी उमेदवारी मागितल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही आणि ते मागणार ही नाहीत, असेही कुडाळ येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 23, 2023 03:16 PM
…आणि हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
ठाकरेगट आणि वंचितच्या युतीची घोषणा, उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले सगळे मुद्दे, पाहा…