Hasan Mushrif | सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र, याचे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील : हसन मुश्रीफ
भाजप नेते किरीट सोमय्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. हसन मुश्रीफ यांनी आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. हसन मुश्रीफ यांनी आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. मी किरीट सोमय्यांचा आभारी आहे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मला डेंग्यू झाला होता मी आता बरा आहे. मी केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या अन्यायी कारवाई विरोधात आवाज उठवतो त्यामुळं सातत्यानं भाजपची मंडळी मला कसं दाबता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत. माझ्या विरोधातली आरोप हे भाजपचं षडयंत्र असून चंद्रकांत पाटील हे त्यामागील मास्टरमाईंड आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. ती नाकारल्यानं इन्कम टॅक्सची धाड माझ्यावर टाकण्यात आली. आयटीनं धाड टाकल्यानंतर कोल्हापूरमध्ये ते झिरो झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन काम करतो, असं किरीट सोमय्या सांगतात. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणं वागावं, माझ्या कुटुंबीयांची बदनामी थांबवावी. किरीट सोमय्यांची सीएची पदवी खोटी आहे काय?, असा मी आरोप केला होता. मी तुमच्याकडे दोन सीए पाठवतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी यावेळी किरीट सोमय्यांवर मागील वेळी 100 कोटी आणि यावेळी 50 कोटींच्या अब्रुनुकसानीचा आरोप केला आहे.