मनोज जरांगेंकडून शिवीगाळ, प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं…

| Updated on: Jul 18, 2024 | 6:08 PM

मीही एक मराठा आहे. मीही सभागृहात प्रश्न उचलत असतो. त्यांनी माझ्यावर कितीही टीका करू द्या मी माझी पातळी सोडणार नाही. कारण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आहेत, असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांनी शिवीगाळ केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे

जरांगे पाटील हे माझे बंधू आहेत. त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली तरी मी तशी टीका करणार नाही. मीही एक मराठा आहे. मीही सभागृहात प्रश्न उचलत असतो. त्यांनी माझ्यावर कितीही टीका करू द्या मी माझी पातळी सोडणार नाही. कारण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आहेत, असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांनी शिवीगाळ केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले, हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं… पण ती चर्चा त्यांच्या अंतरवाली सराटीमध्ये होणार नाही तर ती चर्चा मंत्रालय, सह्याद्री इथं होईल. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं. पण केंद्रात पवार आणि उद्धव ठाकरे ते टिकवू शकले नाही. त्यांना जाब विचारायची हिंमत जरांगेमध्ये आहे का? असा सवालही प्रसाद लाड यांनी केला.

Published on: Jul 18, 2024 06:08 PM
भंगार नेता, एवढं प्रेम तर फडणवीसांसोबत लग्न कर…भाजप नेत्यावर टीका करताना जरांगेंची जीभ घसरली
लाडक्या भाऊ-बहिणीनंतर आता लाडका दिव्यांग, लाडका शेतकरी येणार? सरकारकडे कोणाची मागणी?