शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्रावरून आदित्य ठाकरे आणि प्रवीण दरेकर आमने-सामने, म्हणाले…

| Updated on: Jan 23, 2023 | 9:47 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज अनावरण

आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे. अशातच शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्रावरून आदित्य ठाकरे आणि प्रवीण दरेकर हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याने ‘बाळासाहेबही विचार करतील गद्दार माझं तैलचित्र लावणार का?, गद्दार यांच्या हस्ते तैलचित्राचं अनावरण करणार का?’ अशी टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर केली आहे. तर या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, आजूनही सुधारण्याचे कोणतेही लक्षण दिसत नसून गद्दार, बोके, खोके यांच्या पलीकडे एकनाथ शिंदे कोसो मैल दूर गेले आहेत. तुम्ही टोमणे मारत रहा, टीका करत रहा आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे पडलं आहे. तुम्ही अडीच वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं, २५ वर्षात मुंबईची वाट लावली. आता आम्हाला विकास करायचा आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही तुमच्या वडिलांचे तैलचित्र लावू शकला नाहीत.

Published on: Jan 23, 2023 09:44 AM
बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज अनावरण, कोण-कोण हजेरी लावणार?
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलाय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं टीकास्त्र