अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यावर दरेकरांचा इशारा, खुमखुमी असेल तर ‘दिल्ली’शी बोला…

| Updated on: Jul 17, 2024 | 10:39 AM

महायुतीत अजित पवारच खडा टाकत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. भाजप सोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदा लोकसभेच्या जागा वाटपावरून खंत वजा नाराजी व्यक्त केली. नगर माढ्याची जागा आम्हाला दिली असती तर वियज झाला असता, या अजित पवार यांच्या विधानावर भाजपचं उत्तर

नगर माढ्याची जागा आम्हाला दिली असती तर वियज झाला असता, या अजित पवार यांच्या विधानावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक उत्तर दिलंय. त्यावरून महायुतीत अजित पवारच खडा टाकत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. भाजप सोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदा लोकसभेच्या जागा वाटपावरून खंत वजा नाराजी व्यक्त केली. मात्र जर इतकीच खुमखुमी असेल तर अजित पवारांनी दिल्लीत जाऊन आमच्या वरिष्ठांशी बोलावं, असं उत्तरच भाजपच्या दरेकर यांनी अजित पवारांना दिलं. महायुतीमध्ये लढणार असं सांगताना भाजपनं धाराशिवची जागा इच्छा नसतानाही लढायला लावली आणि नगर माढ्यात इच्छा असतानाही लढायला मिळालं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्रासामुळेच निलेश लंके महाविकास आघाडीमध्ये गेल्याचा मोठा दावाही अजित पवार यांनी केला आहे. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 17, 2024 10:39 AM
अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, आम्ही त्यांचं…, प्रकाश आंबेडकरांकडून मोठी ऑफर
विशाळगडाच्या अतिक्रमणावरून रंगतोय राजकीय वाद, नेमका कुणाचा हात?