‘आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी’, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवरील ‘त्या’ वक्तव्यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांचा टोला

| Updated on: Nov 21, 2024 | 5:43 PM

आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, असं वक्तव्य शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या शनिवारी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस बाकी असताना अशातच राजकीय पक्षांकडून आतापासूनच आमदारांसाठी हॉटेल बुकिंगची योजना आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, असं वक्तव्य शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांच्या हॉटेल बुकिंगवरून दिलेल्या खोचक प्रतिक्रियेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर भाष्य केले आहे. ‘जितेंद्र आव्हाड यांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी’, असं वक्तव्य करत प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला लगावला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी आकलन विश्लेषण करून अशी वक्तव्य करावीत असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Published on: Nov 21, 2024 05:43 PM
‘लाडक्या बहिणी’चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा
Gautam Adani : उद्योगपती गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?