आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय, लवकरच…
VIDEO | आगामी निवडणूक प्रमुखांची टीम भाजपकडून सज्ज; लोकसभा, विधानसभेसाठी कोणता घेतला निर्णय?
मुंबई : राज्यातील आगामी निवडणुकाबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच राज्यातील आगामी निवडणूक प्रमुखांची टीम भाजपकडून सज्ज झाल्याची माहिती समोर येत आहे. मिशन लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप लवकरच लोकसभा आणि विधानसभेसाठी २८८ मतदारसंघ निवडणूक प्रमुख जाहीर करणार आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी शनिवारी बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. तर या झालेल्या बैठकीनंतर ही महत्त्वाची बातमी समोर येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. तर शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखाची जबाबदारी त्या त्या मतदारसंघानुसार असणार आहे.
Published on: Jun 04, 2023 12:37 PM