मुंबई ‘मनपा’मध्ये ‘भाजप’चा महापौर होणार? आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 16, 2023 | 10:11 AM

VIDEO | मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर? भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी काय केलं कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कालपासून मुंबई दौऱ्यावर असून काल त्यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. अमित शाह हे काल संध्याकाळी मुंबईत आले असताना त्यांनी भाजपच्या 13 जणांच्या कोअर कमिटीशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच आशिष शेलार यांच्यासह इतर नेतेही या बैठकीला उपस्थित होते. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवा. भाजप, शिंदे गट आणि आरपीआय महायुतीचा महापौर महापालिकेत बसला पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, असे आदेश अमित शाह यांनी दिला आहे. यानंतर आशिष शेलार यांनी देखील कार्यकर्त्यांना असे आवाहन केले आहे. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमित शाह यांनी आढावा घेतला असल्याचे दिसून आले.

Published on: Apr 16, 2023 09:54 AM
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा दावा म्हणाले, श्री सदस्य पैसे…
गुलाबराव पाटील कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत का? ‘त्या’ दाव्यावर सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर