जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून मराठा उमेदवारांना संधी, कोण आहेत ते 10 मराठा शिलेदार?

| Updated on: Oct 21, 2024 | 12:43 PM

BJP Candidate First List : भाजपकडून पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये तब्बल ९९ उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांपैकी जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून 10 मराठा उमेदवारांना संधी

Follow us on

मनोज जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून 10 मराठा उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. काल रविवारी जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील 10 उमेदवारांना संधी देत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर इतर जातींच्या 6 जणांना भाजपने मराठवाड्यात संधी दिली आहे. या 10 जणांमध्ये भोकरच्या श्रीजया चव्हाण, नायगावयेथील राजेश पवार, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, जिंतूर येथील मेघना बोर्डीकर, परतूरचे बबनराव लोणीकर, भोकरदनचे संतोष दानवे, फुलंब्रीचे अनुराधा चव्हाण, निलंगा येथील संभाजी निलंगेकर, औसा येथील अभिमन्यू पवार, तुळजापूरचे राणाजगजितसिंग पाटील यांना मनोज जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर इतर जातींमध्ये मुखेड येथून तुषार राठोड (OBC), किनवट येथून भीमराव केरम (ST), केज येथून नमिता मुंदजा (SC),संभाजीनगर पूर्व येथून अतुल सावे (OBC), गंगापूर येथून प्रशांत बंब (मारवाजी) आणि बदनापूर येथून नारायण कुचे (SC) यांना भाजपने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.