विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘ही’ 10 नावं केंद्राकडे, आघाडीवर कोणत्या महिला नेत्याचं नाव?

| Updated on: Jun 28, 2024 | 2:35 PM

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 10 नावं निश्चित केली असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेसाठी 10 नावं भाजपने केंद्राला पाठवली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, या दहा नावांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असून महिला नेत्यांमध्ये त्यांचं नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे

Follow us on

लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 10 नावं निश्चित केली असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेसाठी 10 नावं भाजपने केंद्राला पाठवली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, या दहा नावांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असून महिला नेत्यांमध्ये त्यांचं नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. जर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली तर त्यांना मंत्रिपद देखील देण्यात येईल, अशी चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्यानंतर चित्रा वाघ यांचा देखील या नावाच्या यादीत समावेश आहे. पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक आणि माधवी नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.