नारायण राणेंचा भाजपकडून पत्ता कट, तर २४ तासात अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी
भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा तिकीट दिलं नाही तर कालच भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना तिकीट दिलं. दरम्यान, भाजपकडून एक सरप्राईजली नावही समोर आलंय. नारायण राणे यांचा पत्ता कट करत भाजपनं २४ तासांच्या आत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा तिकीट दिलं नाही तर कालच भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना तिकीट दिलं. दरम्यान, भाजपकडून एक सरप्राईजली नावही समोर आलंय. नारायण राणे यांचा पत्ता कट करत भाजपनं २४ तासांच्या आत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिलीये. म्हणजे नारायण राणे आता केंद्रीय सूक्ष्म आणि लघू उद्योगमंत्री पदावरून पायउतार होणार आहे. तर भाजपकडून अशोक चव्हाण यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्यात आली आहे. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत पण ते राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार आहे. तर शिंदे गटाकडून आहे त्याच उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली.