‘औरंग्याची वृत्ती आणि उद्धव ठाकरे यांची वृत्ती यामध्ये काय फरक आहे?’, भाजप नेत्याचा आक्रमक सवाल

| Updated on: Aug 07, 2023 | 10:39 AM

VIDEO | 'सत्तेसाठी आपल्या वडिलांच्या विचारांना जेलमध्ये टाकलं', उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाची जहरी टीका? औरंग्याची वृत्ती आणि उद्धव ठाकरे यांची वृत्ती यात काय फरक आहे? तुषार भोसले यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

नाशिक, ७ ऑगस्ट २०२३ | औरंगजेब देवेंद्र फडणवीस यांचा हिरो होऊ शकत नाही, पण देशाचा हिरो होऊ शकतो, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.  अशातच आता, औरंग्याची वृत्ती हीच खरी उद्धव ठाकरे यांची वृत्ती असल्याची जहरी टीका भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली. सत्तेसाठी औरंगजेबाने आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं आणि इथे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आपल्या वडिलांच्या विचारांना जेलमध्ये टाकलं, असे म्हणत तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे औरंग्याची वृत्ती आणि उद्धव ठाकरे यांची वृत्ती यात काय फरक आहे? असा सवाल आक्रमक होत तुषार भोसले यांची उद्धव ठाकरे यांना केला आहे तर अशा व्यक्तीने भाजपला बुद्धी शिकवू नये, असेही म्हणत फटकारले आहे.

Published on: Aug 07, 2023 10:36 AM
‘महाराष्ट्रात ED, CD फक्त मराठी माणसाला लागली’; ठाकरे गटाच्या नेत्याची कोणावर टीका
“उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलंय”; भाजप खासदाराचा हल्लाबोल