WITT Global Summit : मी प्रभू श्रीरामाचा पुजारी पण… काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य अन् भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Feb 27, 2024 | 2:07 PM

आज सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वजण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर भाष्य करताना दिसणार आहे. आजच्या सत्रात काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया या परिषदेच्या पहिल्या सत्रात सहभागी झाले होते

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२४ : आज टीव्ही 9 च्या ‘सत्ता संमेलन’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज आपले विचार व्यक्त करताना दिसणार आहे. आज सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वजण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर भाष्य करताना दिसणार आहे. आजच्या सत्रात काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया या परिषदेच्या पहिल्या सत्रात सहभागी झालेत. ‘2024 मध्ये सत्ता कोणाची’ या विषयावर दोघेही आपली मते मांडत आहेत. यावेळी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा देखील चर्चेत आला. यावेळी राम मंदिर निर्माण करण्यात भाजप यश असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला तर यावरून काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ…

Published on: Feb 27, 2024 02:07 PM
‘इतकी वर्षे संधी होती तरी मराठा…,’ काय म्हणाले एकनाथ शिंदे
Video | ‘सरकार काही माझं शत्रू नाही, मी माझ्या…,’ काय म्हणाले मनोज जरांगे