WITT Global Summit : ‘अजित पवार पहले चक्की पीसिंग और अब…’, प्रमोद तिवारी यांच्या टीकेवर गौरव भाटिया यांचे प्रत्युत्तर काय?

| Updated on: Feb 27, 2024 | 1:26 PM

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबाबत तिवारी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या विचारांवर ठाम राहावे पण ज्यांनी पक्ष बदलला त्यांना माझ्या शुभेच्छा....'

Follow us on

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराबाबत भाजपच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. यासाठी प्रमोद तिवारी यांनी अजित पवार यांचा पक्ष आता भाजपसोबत असल्याचे उदाहरण दिले. तर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबाबत तिवारी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या विचारांवर ठाम राहावे पण ज्यांनी पक्ष बदलला त्यांना माझ्या शुभेच्छा, असे खोचकपणे भाष्य केले. भाजपने भ्रष्टाचार केला तर शिष्टाचार आणि इतर कोणी केला तर तो भ्रष्टाचार. प्रमोद तिवारी यांच्या टीकेवर पलटवार करताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रत्युत्तर दिलंय. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये गेल्या दहा वर्षांत एकही भ्रष्टाचार झालेला नाही, पंतप्रधान मोदींचा रेकॉर्ड स्वच्छ असल्याचे म्हटले. दरम्यान, प्रमोद तिवारी यांनी मोदींवर कडाडून टीका करत म्हटले, यापूर्वी भाजप आणि मोदी अजित पवारांना भ्रष्ट म्हणायचे. पण जेव्हा राष्ट्रवादीसोबत भाजपचे सरकार आले. तेव्हा त्यांना अर्थमंत्रालय देण्यात आले. प्रमोद तिवारी यांनी खोचकपणे म्हटले की, ‘अजित पवार पहले चक्की पीसिंग और अब माल पीसिंग.’