Nana Patole| भाजपकडून देशाचं खाजगीकरण सुरू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आधी नागपूरमधून चालायची ,आता दिल्लीतून चालतेय. तो फरक आता जाणवायला लागलाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आधी नागपूरमधून चालायची ,आता दिल्लीतून चालतेय. तो फरक आता जाणवायला लागलाय. भाजपमध्ये आज आरएसएसची घराणेशाही आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. इथे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. संघात त्यांच्याच विचाराचा माणूस वरपर्यंत जातो. मोदीजींनी जो आरोप केलाय, तो संघाच्या घराणेशाहीवर केलाय, काँग्रेसवर नाही, असा टोला पटोले यांनी लगावला. भाजपमध्ये संघाची घराणेशारी चाललीय ती घराणेशाही नाही? का असा सवाल देखील नाना पटोले यांनी केला.
कोरोनात केंद्रात हिंदू विचाराचे लोक सत्तेत असूनंही गंगा नदीत हिंदूते प्रेत वाहत होते. विटंबना होत होती. हिंदू मरत होते, याची आठवण नाना पटोले यांनी करुन दिली आहे. हा देश संविधानाला मानणारा आहे, काँग्रेस संविधानाच्या विचाराने चालली आहे. मी स्वत: हिंदू आहे. या देशाच्या लोकशाहीत सर्व धर्माला घेऊन चालावं लागतं, असं नाना पटोले म्हणाले. काही लोक या व्यवस्थेला मक्तेदारी म्हणून चालत असेल तर ती मक्तेदारी होऊ शकत नाही, असं नाना पटोले म्हणाले.