VIDEO : Maharashtra political crisis | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सागर बंगल्यावर दाखल
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दररोज वेगवेगळ्या घटना घडतायंत. राज्याच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस अत्यंत मोठा आणि महत्वाचा असणार आहे. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे आहे. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचताना दिसतो आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सागर बंगल्यावर बैठक होणार असल्याचे कळते आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दररोज वेगवेगळ्या घटना घडतायंत. राज्याच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस अत्यंत मोठा आणि महत्वाचा असणार आहे. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे आहे. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचताना दिसतो आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सागर बंगल्यावर बैठक होणार असल्याचे कळते आहे. इतकेच नाही तर भाजपाच्या सर्व आमदारांना आज मुंबईमध्ये दाखल होण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. शिवसेनेच्या वकिलांनी ही याचिका दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बाजूने खटला लढणारे वकील नीरज किशन कौल म्हणाले, ‘बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश देणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंबंधी प्रलंबित याचिकेशी बहुमत चाचणीशी काहीही संबंध नाही. सुप्रीम कोर्टानेही हेच म्हटले आहे..’ शिवसेनेच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने पाच वाजता सुनावणी घेण्याचं म्हटलं आहे.