‘2024 पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये म्हणून पत्रकारांना ढाब्यावर अन् चहाला न्या’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘ती’ क्लिप व्हायरल

| Updated on: Sep 25, 2023 | 2:49 PM

VIDEO | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाजपच्या वरिष्ठांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना? चंद्रशेखर बावनकुळे यांची व्हायरल होणारी 'ती' कथित ऑडिओ क्लिप ऐकलीत का?

अहमदनगर, 25 सप्टेंबर 2023 | आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरूये. ‘2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, अशी तजवीज करा. यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना धाब्यावरही घेऊन जा. जेवू घाला. आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये’, असं या कथित ऑडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असल्याचे सांगितले जात आहे. ही ऑडिओ क्लीप चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचनेची ऑडिओ क्लिप असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, tv9 मराठी या ऑडीओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Published on: Sep 25, 2023 02:19 PM
‘… म्हणून पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस’, बच्चू कडू यांनी सांगितलं थेट कारण
सौताडा येथील रामेश्वर धबधबा प्रवाहित अन् पर्यटकांना पर्वणी, बघा धबधब्याची विहंगम दृश्य