‘उद्धव ठाकरेंची अवस्था ‘शोले’तील जेलर असरानी सारखी, आधे इधर आधे उधर…’, भाजपच्या बड्या नेत्याची बोचरी टीका

| Updated on: Nov 26, 2024 | 5:11 PM

उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असतील, तर आमचे २० आमदार त्यांना पुरुन उरतील. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल केला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्याचे पाहायला मिळाले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला दणदणीत यश मिळालं. महायुतीला २३० जागा मिळाल्या तर एकट्या भाजपच्या १३२ जागा आल्यात. दरम्यान, महायुतीने विधानसभेला महाविकास आघाडीची सुपडासाफ केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, महायुतीला मोठं यश मिळाल्याने आता मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यातच रस्सीखेच सुरू झाली आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपा नेतेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी करतायंत. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असतील, तर आमचे २० आमदार त्यांना पुरुन उरतील. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल केला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटातील जेलर असरानी सारखी असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांचे २० पैकी १८ आमदार पळून जातील त्यापैकी उरतील फक्त दोनच.. असं वक्तव्यही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. बघा व्हिडीओ…

Published on: Nov 26, 2024 05:11 PM
‘शरद पवार नावाचा अध्याय राज्याच्या राजकारणातून संपला’, भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा निशाणा
Petition against EVM : बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, सुप्रीम कोर्टाचा थेट नकार, ‘ती’ याचिका फेटाळली