मतांसाठी दहशतवादी कसाबची बाजू…थोडीतरी लाज बाळगा; भाजप नेत्याचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल

| Updated on: May 05, 2024 | 2:27 PM

निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपालाविरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? असा सवाल करत भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली, असं वक्तव्य करत भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार सडकून टीका केली. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपालाविरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तर थोडी तरी लाज बाळगा, असे म्हणत त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. तर जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार घणाघात केलाय.

Published on: May 05, 2024 02:27 PM
2004 ला दादा मुख्यमंत्री असते पण शरद पवारांनी ‘तो’ प्रस्ताव नाकारला, कुणी केला गौप्यस्फोट?
हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ