Chandrasekhar Bawankule यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा , ‘… तर पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेऊ’

| Updated on: Sep 22, 2023 | 11:25 AM

VIDEO | पुण्यातील भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना नेमका काय दिला इशारा? आगामी २०२३ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा राज्यभरात बैठकींचा धडाका

पुणे, २२ सप्टेंबर २०२३ | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या नव्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या नव्या कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. यावेळी नव्या कार्यकारिणीतील सदस्यांची बैठक आणि त्यांचा सत्कार करण्यात आला होता. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले होते. या कालच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. काम न करणाऱ्या आणि व्यवस्थित जबाबदारी पार न पाडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे इशाराच दिला आहे. दरम्यान, आगामी २०२३ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. यासोबतच त्यांनी बैठकांचं सत्रही सुरू केले आहे.

Published on: Sep 22, 2023 11:24 AM