Suresh Dhas : ‘आकाच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या’, आरोपींच्या कबुलीनंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया

Suresh Dhas : ‘आकाच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या’, आरोपींच्या कबुलीनंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 28, 2025 | 4:58 PM

सुदर्शन घुलेच्या मित्राच्या जबाबातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता.

सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केली, असं आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना जबाबात म्हटलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचा जबाब समोर आल्यानंतर बीडच्या आष्टीतील भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोण सुग्रीव कराड, त्याचा या प्रकरणात काहीही संबंध नाही, असं सुरेश धस म्हणाले. तर आकाच्या सांगण्यावरून केलं हे आरोपींनी कबुल केलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली. इतक्या भयानक पद्धतीने कुठेही हत्या झाली नसेल, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आरोपी सुदर्शन घुलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबातील थेट वाल्मिक कराडचं नाव घेतल्याचे पाहायला मिळाले. घुलेनं जबाबातील म्हटले की वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहे. मी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे. वाल्मिक कराडनं सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानेच अपहरण करून हत्या केली.

Published on: Mar 28, 2025 04:58 PM
Rohit Pawar : कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर.. ; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
Ajit Pawar : ३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना